uddhav thackeray and eknath shinde

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पहिल्यांदा ही सुनावणी होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार असून त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आजच्या सुनावणीत काय होणार? कुणाची बाजू वरचढ राहणार हे आज स्पष्ट होणार आहे. 

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. सुनावणीची तयारी पूर्ण केली असून, शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांनी २५ सप्टेंबरला उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी ठाकरे व शिंदेंनाही वैयक्तिक नोटीस पाठवली असल्याची माहिती आहे. त्यामुळं आज दुपारी तीन वाजता सुनावणी पार पडणार आहे.

    निकाल कुणाच्या बाजूनी लागणार?

    दरम्यान, सुप्रीम कोर्टाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिलेले होते. तशीही आमची सुनावणी १४ तारखेला झालेली होती आणि पुढील सुनावणी प्रस्तावित होती. त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही सुनावणी घेऊन निर्णय घेऊ. गरज पडली तर दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना बोलावण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले होते. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पहिल्यांदा ही सुनावणी होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार असून त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आजच्या सुनावणीत काय होणार? कुणाची बाजू वरचढ राहणार हे आज स्पष्ट होणार आहे.

    सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करा

    शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षांना पाठविले आहे. वडट्टेवार म्हणाले की, सुनावणी पारदर्शक करण्यात यावी त्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण गरजेचे आहे.