कुडाळ तालुक्यामध्ये उबाठा गटाला जोरदार धक्का

    कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पावशी गावचे माजी शाखाप्रमुख सागर तुळसकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख दीक्षा सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला.

    उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या प्रवेशकर्त्यांमध्ये सिद्धेश सावंत, गौरव फोंडके, शंकर पारकर, फाळके, सचिन फाळके भूपेंद्र पारकर, रणजित सावंत, दर्शन पारकर, सिद्धेश प्रभू, किशोर राऊळ, नितेश शेडगे, आदित्य राणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षाची धेय्य धोरणे लोकांपर्यंत पोहचवून त्यांचा प्रचार करू अशी ग्वाही यावेळी प्रवेशकर्ते यांनी दिली. यावेळी शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा क्षेत्रप्रमुख संदेश सावंत-पटेल, शिवसेना महिला आघाडी विभागप्रमुख आराध्या करलकर, विभागप्रमुख जयदीप तुळसकर, चैतन्य कुडाळकर, रामकृष्ण गडकरी, रत्नाकर जोशी, युवा कार्यकर्ते अनिकेत तेंडुलकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.