पालघर मधील जव्हार-सिल्व्हासा रोड वर दोन एसटी बसेसची जोरदार धडक, २० प्रवाशी जखमी

    पालघर मध्ये सकाळी जव्हार-सिल्व्हासा रोड वर 2 एसटी बसची एकमेकांना धडक बसली आहे. या दुर्घटनेमध्ये 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर नजिकच्या रूग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.