मावळात मान्सूनच्या पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला

पवन मावळातील शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजानुसार पावसापूर्वी पवना नदीच्या पाण्यावर १५ दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या भातरोपांची उत्तम वाढ झाली असून, ती हिरवीगार भातरोपे शेतात वाऱ्यावर डोमाने डोलत आहे.

    लोणावळा : आठवड्याभरापूर्वी हजेरी लावलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीनंतर मान्सून पावसाने मावळात सर्वदूर दमदार हजेरी लावल्याने मावळातील बळीराजासह सर्व स्तरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून धुळवाफेवरील भातपेरणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे.

    पवन मावळातील शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजानुसार पावसापूर्वी पवना नदीच्या पाण्यावर १५ दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या भातरोपांची उत्तम वाढ झाली असून, ती हिरवीगार भातरोपे शेतात वाऱ्यावर डोमाने डोलत आहे.

    मागील दोन आठवड्यापासून मावळातील शेतकरी शेतीची नांगरणी, भातखाचर व वावरातील मोठी ढेकळे बारिक करणे (लोडणी), कुळपणी, रोपांची वाढ उत्तम व्हावी याकरीता राना वनातील पालापाचोळा गोळा करून त्यात शेणखत एकत्र करून भात रोपवाटीकेची भाजणी करणे, अशाप्रकारच्या विविध शेतीच्या मशागतीची कामांमध्ये शेतकरी व्यस्त होते. तत्पूर्वी गतवर्षीच्या पूरात भातखाचरांचे फुटलेले आणि वाहून गेलेल्या बांधाची दुरूस्ती व बांधणीलाहि करत होते.

    मावळामधील पवनमावळ परिसरातील शेतकऱ्यांनी मान्सूपूर्व पावसापूर्वी पवनानदी व बोरवेलच्या पाण्यावर १५ दिवसांपूर्वीच भातपेरणी केलेल्या भातरोपांची उत्तम वाढ झाली असून, ती हिरवीगार भातरोपे वाऱ्यावर डोमाने डोलत आहे.