भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रतनवाडीला अतिवृष्टीचा तडाखा; थंडीने जनावरेही गारठली 

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रतनवाडीला अतिवृष्टीचा (Heavy Rain in Ahmednagar) तडाखा बसला. घाटघर येथे सकाळी ११ इंच, रतनवाडी साडेदहा इंच,भंडारदरा येथे दहा इंच पाऊसची नोंद झाली. 

    अकोले : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रतनवाडीला अतिवृष्टीचा (Heavy Rain in Ahmednagar) तडाखा बसला. घाटघर येथे सकाळी ११ इंच, रतनवाडी साडेदहा इंच,भंडारदरा येथे दहा इंच पाऊसची नोंद झाली.

    आढळा, शिळ वंडी-घोटी जलाशय रात्री उशिरापर्यंत भरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या आहेत. आदिवासी शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर गारठा वाढल्याने माणसांबरोबर जनावरे गारठले आहेत. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रस्ते, भातपिके पाण्यात गेली आहेत.

    विजेचे पोल पडल्याने वीज बंद आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे. कृष्ण वणती नदीला पूरजन्य परिस्थिती आहे. भंडारदरा जलाशयात वेगाने आवक होत असून, गुरूवारी सायंकाळी ६ वाजता जलाशयात ६९४७ ,(६२.९३%) दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. आवक ४३३.६२ दशलक्ष घनफूट झाली. तर वीज निर्मितीसाठी ८४५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर निळवंडे जलाशयात ५१८८ (६२.२९%) दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.