संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पेठवडगाव शहर व परिसराला बुधवारी पहाटेपासून परतीच्या पावसाने (Heavy Rain) झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने दिवाळीच्या उत्साहावर पाणी फिरवले. पहाटेपासूनच रिपरिप पावसाला सुरुवात झाली.

    कोल्हापूर : पेठवडगाव शहर व परिसराला बुधवारी पहाटेपासून परतीच्या पावसाने (Heavy Rain) झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने दिवाळीच्या उत्साहावर पाणी फिरवले. पहाटेपासूनच रिपरिप पावसाला सुरुवात झाली.

    सकाळी सातनंतर मात्र विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह धो-धो पाऊस कोसळू लागला. वडगाव शहरासह ग्रामीण भागातही दिवाळी बाजार साहित्यांनी भरला आहे. दरम्यान, कोकणात रत्नागिरीतही पावसाने भातपिकाचे नुकसान झाले.

    आधीच बाजारात मंदी आणि त्यात या पावसामुळे छोट्या व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली. राधानगरीसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विजांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने सकाळपासून जोरदार सुरुवात केली. यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.

    साताऱ्यातही मुसळधार पाऊस

    पुसेगाव परिसरात दमदार पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी वर्ग सुखावला गेला असून, गेले तीन दिवसाचे ढगाळ वातावरणानंतर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता पावसाने सुरुवात केली. सुमारे एक तास पडणाऱ्या मुसळधार पावसाने परिसरामध्ये पाणी पाणी केले असून, रब्बी पिकाला जीवदान देणारा हा पाऊस असल्याने पुसेगाव परिसरात शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.