नागपुरात मुसळधार पाऊस; तासभर झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी

गेल्या काही दिवसांपासून हवामानात (Climate Change) कमालीचा बदल जाणवत आहे. कडक उन्हाने अंगाची पुरती लाहीलाही झाली आहे. त्यातच नागपुरात मुसळधार पावसाने सकाळी हजेरी लावली. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

    नागपूर : गेल्या काही दिवसांपासून हवामानात (Climate Change) कमालीचा बदल जाणवत आहे. कडक उन्हाने अंगाची पुरती लाहीलाही झाली आहे. त्यातच नागपुरात मुसळधार पावसाने सकाळी हजेरी लावली. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

    या परिसरात अचानक आकाश हे काळे-निळे झाले. त्यानंतर काही वेळातच ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील सखल भागात तसेच रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. दुपारी उन्ह असले तरी पुन्हा तीन तास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. वादळी पावसाने दक्षिण नागपूरसह अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. ठिकठिकाणी झाडे व पोल पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

    दरम्यान, भारतीय हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यामध्ये गुरुवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. वादळी वाऱ्यासह गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. असे असताना हवामान विभागाचा हा अंदाज आता खरा ठरल्याचे म्हटले जात आहे.