मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर, नाशिकमध्ये मंदिरे पाण्याखाली

गंगापूर धरणातून ७ हजार ३८९ क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत.

    नाशिक – येथे सलग २ दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain In Nashik) सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीने (Godavari River ) रौद्रावतार धारण केला असून नदीला चौथ्यांदा पूर आला आहे. पुण्यातही (pune) पावसामुळे जवळपास सर्व धरणे काठोकाठ भरली आहेत. येत्या ३ ते ४ तासांमध्ये खडकवासला (khadakwasla) धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये अंदाजे २२ हजार ते २५ हजार क्युसेक विसर्ग सोडला जाण्याची शक्यता आहे.

    गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढल्याने किनाऱ्यावरील सर्व मंदिरे पाण्याखील गेली आहेत. त्यामुळे देशभरातून नाशिकमध्ये पुजेसाठी तसेच पिंडदान करण्यासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच, नदीकिनाऱ्यावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचाही इशारा दिला आहे.

    गंगापूर धरणातून ७ हजार ३८९ क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. तर, अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. गंगापूर प्रमाणेच दारणा, कडवा, पालखेड धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी, दारणा, कादवा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवणार असल्याची माहीती प्रशानसनाने दिली आहे.