
शहरात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह (Lightning Strike) काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी (Rain in Pune) लावली.
पुणे : शहरात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह (Lightning Strike) काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी (Rain in Pune) लावली. पुणे शहरात मुख्य पेठांच्या परिसरासह डेक्कन, पाषाण, सूस रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, वारजे, कोंढवा, कोथरूड आदी भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी अचानक पाऊस यामुळे पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाऊस अनुभवायला मिळाला. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यातच आज सायंकाळी पाच वाजल्यापासून अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची एकच धावपळ उडाली. राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
सातारा, कोल्हापूरमध्ये पाऊस
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या ठिकाणी देखील पाऊस झाला. तर नंदुरबारसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.