संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

अचानक आलेल्या वादळी वारे आणि गारपीट पावसामुळे (Heavy Rain) सांगलीच्या ऐतवडे खुर्दमध्ये दोन घरावर झाड पडून नुकसान झाले. मान्सूनपूर्व पावसाने पश्चिम भागात हजेरी लावली असली तरी पूर्व भाग पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

    सांगली : अचानक आलेल्या वादळी वारे आणि गारपीट पावसामुळे (Heavy Rain) सांगलीच्या ऐतवडे खुर्दमध्ये दोन घरावर झाड पडून नुकसान झाले. मान्सूनपूर्व पावसाने पश्चिम भागात हजेरी लावली असली तरी पूर्व भाग पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

    सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वैभव बाळासो दाइंगडे व दत्तात्रय शहाजी पाटील यांच्या वारणा शिक्षण संस्थेच्या शेजारी असणाऱ्या घरावर शनिवारी पाऊस झाला. या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट पावसामुळे झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

    दरम्यान, शुक्रवारी आणि शनिवारी दिवसभर उन्हाने लाहीलाही होत असताना सायंकाळी विजेच्या गडगडाटासह ऐतवडे खुर्दसह कुंडलवाडी चिकुर्डे देवर्डे आदी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.