sindhudurg rain

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट  (Yellow Alert For Sindhudurg) जारी करण्यात आला आहे. कणकवली शहरारील जानवली नदीवरील गणपती साणा येथेही पाणी भरले आहे.

    कणकवली : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची (Heavy Rain In Sindhudurg) संततधार सुरु आहे. पुढील दोन दिवस यलो अलर्ट  (Yellow Alert For Sindhudurg) जारी करण्यात आला आहे. तसेच मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आलं आहे.

    पावसामुळे कणकवली आचरा मार्गावर वरवडे सेंट उर्सुला शाळेजवळ गडनदीचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कणकवली तालुक्यात पावसामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

    कणकवली शहरारील जानवली नदीवरील गणपती साणा येथेही पाणी भरले आहे. जानवली व गड नदी दुथडी भरून वाहत आहेत. कणकवली ते आचरा मार्गावर पुराच्या वेळी कायमच पाणी येऊन वाहतूक ठप्प होते. वागदेमध्ये देखील काही घरांना पुराच्या पाण्याने वेढले असल्याची माहिती वागदे पोलीस पाटील सुनील कदम यांनी दिली. तर बावशी गावामध्ये सत्यवान मोर्ये यांचे मातीचे घर कोसळून २ लाख १०हजार रुपयांचे नुकसान झाले.