संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

राज्यासह देशात गेले काही दिवस पावसाची हजेरी (Monsoon Update) पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास (Return Monsoon) सुरु झाला असला तरी, राज्यात काही ठिकाणी हवामान विभागाकडून (Meteorological Department) अलर्ट जारी केला आहे.

    मुंबई : जुलै महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. मात्र त्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. ऑगस्ट महिन्यात राज्यात (State) पावसाने (Rain) विश्रांती घेतली. याचा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. काही ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. तर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मात्र सप्टेबरच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असताना, आता राज्यात राज्यासह देशात गेले काही दिवस पावसाची हजेरी (Monsoon Update) पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास (Return Monsoon) सुरु झाला असला तरी, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी हवामान विभागाकडून (Meteorological Department) अलर्ट जारी केला आहे. (heavy rain to return to state for next two days where orange and yellow alert what has the weather department warned)

    कुठे यलो व ऑरेन्ज अलर्ट?

    दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने कोल्हापूरसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ५ ऑक्टोबरपासून पाऊस परतीच्या मार्गावर असणार आहे.

    पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस?

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. कोकण किनारपट्टीसह गोवा, तामिळनाडू केरळ राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. येत्या 48 तासांत महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे.