
राज्यात विदर्भ सोडता इतरही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बुधवारी संध्याकाळी कोल्हापूर, सातारा आणि नंदूरबारमध्ये अचानक झालेल्या पावसामुळं चांगलीच तारांबळ उडाल्याची माहिती आहे. पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरम राहील अशी माहितीही हवामान विभागानं दिली आहे.
नागपूर – राज्यात (state) उन्हाळ्यात अवकाळी पाऊस (Rain) पडतो आहे. नागपूर (Nagpur) विभागातील सगळ्याच जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं हा इशारा दिला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यात भंडारा, गोदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे वाहतील आणि गारपीट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच आज गुरुवारी पहाटे राज्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह गारपीट व पाऊस पडला.
कधी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता?
गुरुवार – भंडारा, गोदिंया
शुक्रवार- अतिसतर्कतेचा इशारा
शनिवार रविवार- वादळी वारे आणि गारांच्या पावसाची शक्यता
या वादळी पावसामुळं शेती पिकं आणि फळपिकांचं मोठं नुकतसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
राज्याला अवकाळीचा मोठा फटका
राज्यात विदर्भ सोडता इतरही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बुधवारी संध्याकाळी कोल्हापूर, सातारा आणि नंदूरबारमध्ये अचानक झालेल्या पावसामुळं चांगलीच तारांबळ उडाल्याची माहिती आहे. पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरम राहील अशी माहितीही हवामान विभागानं दिली आहे. मध्य महाराष्ट्रातही आज गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मराठवाड्यातही गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. पावसामुळं राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसनं कमी असेल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. तसेच वातावरण बदलामुळं आजार बळावण्याची शक्यता देखील आहे.