संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मराठवाड्यातील पुढील तीन दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपातील पावसाचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात २६ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

    छत्रपती संभाजीनगर : ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. जुलै महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. मात्र त्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात राज्यात (State) पावसाने (Rain) विश्रांती घेतली. याचा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. यामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. काही ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. तर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मात्र सप्टेबर महिन्यात राज्यातील अनेक भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडतोय. आता राज्यातील काही भागात पाऊस होणार असून, मराठवाड्यातील चार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department ) वर्तविला आहे. (heavy rain will fall in these four districts of marathwada what has the weather department warned how much rain yet)

    मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडणार

    मराठवाड्यात तब्बल अडीच महिने पावसाने दडी मारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. तसेच याचा परिणाम पिकांवर देखील झाला आहे. तर बोअरवेल्स आणि विहिरी कोरड्या पडल्या होत्या. तीन दिवस जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणी पातळीत वाढ होणे अपेक्षित आहे. खरीप पिके वाया गेली असली तरी रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. मराठवाड्यातील पुढील तीन दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपातील पावसाचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात २६ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

    आत्तापर्यंत पाऊस किती?

    दरम्यान, मराठवाड्यात सप्टेंबरपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ६४६ मिलीमीटर असून, आतापर्यंत ५२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील २४ तासात शहरात ४१.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून शहरात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत विभागात २५.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जालना (३६.७), बीड (३०.३), लातूर (९.३), धाराशिव (९.४), नांदेड (१६.६), परभणी (२६.७), हिंगोली (१९.१) असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. परतीच्या पावसामुळे पर्जन्य तूट भरुन निघेल, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.

    आत्तापर्यंत किती लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी?

    आतापर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.72 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस पिकाची 42.30 लाख हेक्टर, तूर पिकाची 11.15 लाख हेक्टर, मका पिकाची 9.11 लाख हेक्टर, तसेच भात पिकाची 15.28 लाख हेक्टरवर पुनर्लागवड झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत प्रत्यक्षात 141.09 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 99 टक्के पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर आहे.