बीड शहरासह तालुक्यात तूफान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

बीड शहरासह तालुक्यात तूफान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाला (Unseasonal Rain) मंगळवारी (दि.14) सायंकाळी सुरुवात झाली. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटात तब्बल अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

    बीड : बीड शहरासह तालुक्यात तूफान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाला (Unseasonal Rain) मंगळवारी (दि.14) सायंकाळी सुरुवात झाली. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटात तब्बल अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरलेल्या आणि काढणीने आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

    पावसामुळे आंबा, कांदा, उन्हाळी सोयाबीन, टरबूज, खरबुजासह, भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान खात्याने तब्बल तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. बीडमध्ये मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

    गहू, ज्वारी, टरबूज, आंबा यासोबत भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाल्याने आता शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही.

    विजेच्या कडकडासह पाऊस

    किल्लेधारुर शहरात सतत तिसऱ्या दिवशीही विजेच्या कडकडासह 30 ते 40 मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अंबा, डाळिंब, चिंच या फळ पिकांसह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दाणादाण उडवली असून, तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.