गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यानी पूरस्थितीची केली पाहणी!

नागेपल्ली येथील एफडीसीएम कॅालनीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे एफडीसीएम कालनीच्या चार ते पाच घरात पाणी शिरले. असून सध्या जिल्हा मुख्यालय रिमझिम पाऊस सुरु आहे.

    गडचिरोली : राज्यात सगळीकडे पाऊस पडत आहे. कोकण, मराठवाड्यासह विदर्भाला पावसाने वेढा घातलयं. गेल्या चार दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून भामरागड, अहेरी आणि सिरोंचाला याचा फटका बसला आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला भेट दिली. पुरस्थितीची पाहणी करत संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

    गडचिरोली येथील नियोजन भवन येथे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत त्यांनी आढावा बैठक घेतली.
    जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर गडचिरोली येथे पूर परिस्थितीचा आढावा घेतला. खराब हवामानामुळे हेलिकॅप्टर ऐवजी रस्ते मार्गाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोली येथील प्रत्यक्ष पूरपरिस्थिती आणि बाधित भागाची पाहणी केली त्यानंतर नागपूर येथील विमानतळावरुन विशेष विमानाने मुंबईकडे प्रयाण केले. तसेच दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार तसेच गडचिरोली मेडिकल कॉलेज सुरु करणार असे जाहीर केले.

    गडचिरोलीमध्ये सवर्दूर पाऊस

    गडचिरोलीमध्ये जोरदार पाऊस बरसतोय. या मुसळधार पावसाच्या फटका अनेक नदी-नाल्यांना बसलेला आहे
    नागेपल्ली येथील एफडीसीएम कॅालनीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे एफडीसीएम कालनीच्या चार ते पाच घरात पाणी शिरले. असून सध्या जिल्हा मुख्यालय रिमझिम पाऊस सुरु आहे.

    मेडीगट्टा धरणातून लाख 60 हजार 580 क्युसेक पाण्याचा विसर्ग

    मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 81 दरवाजे सुरू असून यातून सहा लाख 60 हजार 580 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. महाराष्ट्र तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 81 दरवाजे सुरू असून यातून सहा लाख 60 हजार 580 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि या धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी व प्राणहिता चा नद्यांची पातळी वाढलेली आहे.