Heavy rains disrupt life in Mahad

सोमवारी राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चढलेला असताना महाड शहर आणि परिसराला अचानक आलेल्या वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. वादळी पावसामुळे महाडमधील जनजीवन विस्कळीत झाले(Heavy Rains disrupt life in Mahad).

    महाड : सोमवारी राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चढलेला असताना महाड शहर आणि परिसराला अचानक आलेल्या वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. वादळी पावसामुळे महाडमधील जनजीवन विस्कळीत झाले(Heavy Rains disrupt life in Mahad).

    संध्याकाळी चार वाजल्या पासून सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटा सह गारांच्या पावसाने संपूर्ण महाड शहर आणि परिसराला झोडपून काढले, पावसामुळे वातावरणामध्ये गारवा आला. अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ झालीच त्याच बरोबर जनजीवन विस्कळीत झाले.

    सोमवारी सकाळ पासूनच अंगाची ल्हाई ल्हाई होत होती. दुपारी पारा ४२ डिग्री पर्यंत पोहचला असताना अचानक ४ वाजण्याच्या सुमारास संपूर्ण महाड औद्योगिक परिसर तसेच शहर आणि इतर ग्रामीण भागात सोसाट्याचा सुटलेला वारा आणि विजेच्या कडकडाटा सह मुसळधार पावसाने सुरवात केली काही वेळेतच या पावसामध्ये गारा देखील पडू लागल्या.

    अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे संपूर्ण परिसरातील जन जीवन विस्कळीत झाले सुरवातीला सोसाट्याच्या वाऱ्या मुळे शहरातील अनेक दुकानदारानी आपली दुकानेच बंद करून घेतली.

    महाड तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम झाला असून आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यामध्ये सुमारे 40 पेक्षा अधिक वीट भट्टी कारखानदारांचे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांशी गावाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे तसेच महाड शहर शहरांमध्ये देखील दुपारपासून अजून वीज पुरवठा खंडित झाला आहे.