Big Natural Disaster in 2050

मान्सून शनिवारी मुंबई दाखल झाला आहे. शुक्रवारी तळकोकणात मान्सूनने एंट्री केली होती. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार, डहाणू, मुंबई, ठाणे, रायगडमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटकातील गदगपर्यंत मान्सून दाखल झाला आहे(Heavy rains expected in Mumbai in two days).

    मुंबई : मान्सून शनिवारी मुंबई दाखल झाला आहे. शुक्रवारी तळकोकणात मान्सूनने एंट्री केली होती. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार, डहाणू, मुंबई, ठाणे, रायगडमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटकातील गदगपर्यंत मान्सून दाखल झाला आहे(Heavy rains expected in Mumbai in two days).

    मान्सून मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढे सरकला असल्याचे मुंबईच्या हवामान विभागाने सांगितले. राज्यात विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबई आणि उपनगरासह पुणे, नाशिक, कोल्हापूरल या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. गेल्या 24 तासांत जुहू विमानतळ परिसरात 56 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

    पुण्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली असून, पुणे पोलिस आयुक्ताल्यासमोरील झाड कोसळल्याची घटना घडली.आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. पुढील दोन ते तीन दिवस लखलखाट तसेच गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.