जोरदार पावसाने शिरपूर परिसरातील पिकांना फटका, शेतकरी हवालदिल; शिवारात पाणीच पाणी…

पावसाच्या प्रतिक्षेत असलेला शिरपूर परिसरातील बळीराजा झालेल्या जोरदार पावसाने हवालदिल झाला आहे. शिरपुरात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटांसह कोसळलेल्या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे.

    वाशीम : पावसाच्या प्रतिक्षेत असलेला शिरपूर परिसरातील बळीराजा झालेल्या जोरदार पावसाने हवालदिल झाला आहे. शिरपुरात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटांसह कोसळलेल्या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे. शिरपुरात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटांसह कोसळलेल्या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे. फळबागा आणि खरीप पिकांना फटका बसला आहे.

    तूर, हरभरा या पिकांसाठी पाऊस लाभदायक ठरला असला; तरी रात्रभर पाऊस पडल्याने शिरपूर परिसरातील शेत ओलचिंब झाले आहे. मात्र, या पावसाने हरभरा व हदळपिकांना जीवदान मिळाले आहे. विविध रोग व किडींचा प्रादुर्भावामुळे तुरीचे पीक धोक्यात आले होते. या जोरदार पावसामुळे पीक तरणार आहे. तुरीच्या पिकासाठी हा पाऊस अमृततुल्य ठरला आहे. आता तुरीच्या पिकासाठी बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुरू झालेल्या मेघगर्जनेसह पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.

    तसेच नेटवर्क सेवाही काही वेळेसाठी बंद पडली होती. पहाटे 5 वाजेपर्यंत पाऊस कोसळत होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या जोरदार पावसामुळे शिरपुरातील रस्त्यांवर पाण्याचे डबके साचले आहे. वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. शिरपूरजैन येथे 27 नोव्हेंबर रोजी पहाटे 7.30 वाजेपर्यंत 47 मिलिमीटर पाऊस झाला आहे, असे शिरपूर येथील पर्जन्यमापक गजानन वाढे यांनी सांगितले.