पुढच्या ३-४ तासात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरांत पावसाने दडी मारली आहे. पण राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार काही दिवसापासून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच हवामान खात्याकडून पुन्हा राज्यात ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ३-४ तासात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर सातारामध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

    राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरांत पावसाने दडी मारली आहे. पण राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान खात्याकडून पुढचे पाच दिवस पाऊस राहील अशी माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना आहेत.