संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय वातस्थितीमुळे राज्यात पावसाला चालना मिळेल, असे हवामान विभागानं म्हटलं आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीनही विभागांमध्ये सोमवार ते गुरुवार या चार दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे.

  मुंबई- जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली आहे. सध्या राज्यात (State) पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे. यामुळं पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येवू शकते. तसेच मागील वर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत १२२ टक्के पाऊस पडला होता. मात्र यावर्षी फक्त ८९ टक्के पाऊस झाला आहे. ऐन पावसाळ्याच राज्यातील तीनशे पेक्षा अधिक गावांना टॅकरने पाणी पुरवठा केले जात आहे. जुलै महिन्यात पावसाने राज्यातील कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार, रायगड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, विदर्भातील काही जिल्हे, यवतमाळ, मराठवाडा येथे मुसळधार पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी पावसाने दडी मारली. दरम्यान, आज विदर्भात मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाकडून (Meteorological Department ) अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Heavy rains in the state till the end of August; Will there be a water shortage? Heavy rain likely in Vidarbha today)

  ऑगस्ट महिन्यात पावसाची उसंत…

  दरम्यान, जुलै महिन्यात जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र उसंत घेतल्याचं चित्र आहे. मात्र आजपासून राज्यातील काही भागात जोरदार पाऊस होईल, असं हवामान विभागाने म्हटलंय. उर्वरित महाराष्ट्रात मात्र फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारणपणे २१.४ दिवसांमध्ये ५६०.८ मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो. तर मागील वर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत १२२ टक्के पाऊस पडला होता. मात्र यावर्षी फक्त ८९ टक्के पाऊस झाला आहे.

  सप्टेंबरमध्ये समाधानकारक पावसाची शक्यता

  दरम्यान, कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय वातस्थितीमुळे राज्यात पावसाला चालना मिळेल, असे हवामान विभागानं म्हटलं आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीनही विभागांमध्ये सोमवार ते गुरुवार या चार दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे. ऑगस्टमध्ये सरासरीहून कमी पाऊस असल्याने सप्टेंबरमध्ये याची उणीव भरून काढण्याची शक्यता  हवामान विभागानी वर्तवली आहे.

  कमी पावसामुळं पाणी टंचाई?

  ऐन पावसाळ्याच राज्यातील तीनशे पेक्षा अधिक गावांना टॅकरने पाणी पुरवठा केले जात आहे. त्यामुळं राज्यातील काही भागात पाऊस न पडल्यामुलं तिथे टॅकरनं पाणी पुरवठा केले जात आहे. पावसात अशी स्थित मग, पुढे काय? असा सवाल विचारला जातोय, सध्या राज्यातील ३२९ गावांना आणि १२०० पेक्षा अधिक वाड्यांना टॅकरने पाणी पुरवठा केले जातेय.

  विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता…

  राज्यात शनिवारी व रविवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कमी दाबाचे क्षेत्र आणि संबंधित चक्रीय वात स्थितीमुळे राज्यात पावसाला फारशी चालना मिळालेली नाही. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातही कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडेल. मात्र, राज्यभरात पाऊस पडण्याची अपेक्षा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुढील चार दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.