सलग सुट्ट्यांमुळे कार्यालयं ओस, मुंबई-पुणे, मुंबई-गोवा हायवेवर प्रचंड गर्दी; पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल !

लग सुट्ट्यांमुळे जर तुम्ही फिरायला जाण्याचं प्लानिंग केलं असेल, तर त्याआधी तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. सुट्ट्या लागून आल्याने अनेकांनी मुंबईबाहेर (Tourism) जाण्यासाठी प्लॅन आखला असेल. पण पिकनिकसाठी बाहेर पडलेल्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसणार आहे.

    नागपूर : सलग सुट्ट्यांमुळे जर तुम्ही फिरायला जाण्याचं प्लानिंग केलं असेल, तर त्याआधी तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. सुट्ट्या लागून आल्याने अनेकांनी मुंबईबाहेर (Tourism) जाण्यासाठी प्लॅन आखला असेल. पण पिकनिकसाठी बाहेर पडलेल्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे (Holidays) कार्यालयं ओस पडली तर मुंबई-पुणे (Mumbai-Pune), मुंबई-गोवा हायवेवर प्रचंड गर्दी झाल्याचे पाहिला मिळत आहे. दुसरीकडे पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल होताना दिसत आहे.

    स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मंगळवारी सुट्टी असणार आहे. त्यात शनिवार, रविवार अनेकांना सुट्टी असल्याने सोमवारी सुट्टी टाकली आहे. म्हणजेच एकूण चार दिवस सुट्टीचा प्लॅन असल्याने फिरण्याचा आनंद घेणार आहेत, अशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसणार आहे. मुंबईतून मोठ्या संख्येनं पर्यटक शहराबाहेर निघाले असल्याचं पाहायला मिळालंय. त्याचा परिणाम मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

    मुंबईहून पुण्यात जात असताना लागणारा पहिलाच टोलनाका असलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पार करण्यासाठी लोकांना नेहमीपेक्षा तिप्पट ते चौपट वेळ लागतोय. वाहनांच्या दोन ते अडीच किलोमीटर लांब रांगा लागल्यात. फास्टॅगमुळे वाहनांच्या टोलवर रांगा लागणार नाही, असा जो विश्वास व्यक्त केला जात होता, तोही यानिमित्ताने फोल ठरल्याची चर्चा रंगली आहे.