नाशिक लोकसभेचा उमेदवार अखेर ठरला; शिवसेनेच्या ‘या’ उमेदवाराला संधी, शांतीगिरी महाराजांना धक्का

गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले होते. त्यानंतर आता शिवसेनेकडून हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा सस्पेन्स अखेर संपला आहे.

    नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले होते. त्यानंतर आता शिवसेनेकडून हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा सस्पेन्स अखेर संपला आहे.

    नाशिकच्या या जागेसाठी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. पण, त्यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. उमेदवारी जाहीर करण्यास वेळ होत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले होते. हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावला होता. पण, नाशिकमधील भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता.

    मात्र, स्थानिक नेत्यांचा विरोध झुगारुन गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिकच्या राजकारणात अनेक घडामोडी होताना दिसणार आहेत.