girish mahajan

तीन वर्षापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये पुणे कोथरूड परिसरात घडलेल्या घटनेसंदर्भात जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अ‍ॅड. विजय पाटील यांनी तक्रार केली नोंदविली होती. त्यानंतर ती कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) वर्ग करून भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    मुंबई : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा (Jalgaon Jilha Maratha Vidyaprasarak Samaj Sanstha) ताबा मिळावा म्हणून संस्थेच्या विश्वस्तांना धमकावल्याचा आरोप असलेले भाजपाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना उच्च न्यायालयाने (Relief To Girish Mahajan From High Court) तूर्तास दिलासा दिलासा दिला आहे. महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्याविरोधात २४ जानेवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश खंडपीठाने दिले.

    तीन वर्षापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये पुणे कोथरूड परिसरात घडलेल्या घटने संदर्भात जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अ‍ॅड. विजय पाटील यांनी तक्रार केली नोंदविली होती. त्यानंतर ती कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग करून भाजपा नेते गिरीश महाजन आणि स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात दोघांनीही उच्च न्यायालयात धाव याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या.अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

    तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी तक्रारदाराला पुण्यात बोलविण्यात आले. मात्र, तिथे त्यांना प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर फ्लॅटमध्ये नेण्यात आले. त्यानंतर तेथील लोकांनी गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही राजीनामा द्या, असा आरोप पोलीस तक्रारीमध्ये विजय पाटील यांनी केला आहे. तीन वर्षापूर्वी घडलेल्या या कथित घटनेवर आता फिर्याद केली आहे. त्यामुळे ती रद्द करण्यास पूरेसे कारण आहे असा यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. मिलींद साठे यांनी बाजू मांडताना केला. त्याची दखल घेत खंडपीठाने याचिकेची सुनावणी २४ जानेवारीपर्यंत तहकूब केली. तोपर्यंत महाजन आणि नाईक यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करून नये असे निर्देशही पोलीसांना दिले.