falguni pathak

उच्च न्यायालयाच्या (High Court) निर्णयामुळे दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या (Falguni Pathak) गरबा कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे. फाल्गुनी पाठकने आयोजित केलेल्या नवरात्रीच्या या कार्यक्रमाविरोधात वकील मयूर फरिया आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी याचिका दाखल केली होती.

    मुंबई : दांडिया क्वीन (Dandiya Queen) फाल्गुनी पाठकच्या (Falguni Pathak) कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचा (High Court) ग्रीन सिग्नल मिळाला आहे. (Permission To Falguni Pathak Program) सार्वजनिक मैदानावर सशुल्क खासजी कार्यक्रमाला विरोध करणारी जनहीत याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

    याचिकाकर्त्यांचे आरोप योग्य असले तरी आसपासच्या ठिकाणीही असेच कार्यक्रम होत असताना केवळ याच कार्यक्रमावर आक्षेप घेणं अयोग्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले. बोरीवली येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल खेळाचे मैदान आहे. त्यामुळे त्याचे व्यवसायिकीकरण नको असा दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या गरबा कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे. फाल्गुनी पाठकने आयोजित केलेल्या नवरात्रीच्या या कार्यक्रमाविरोधात वकील मयूर फरिया आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी याचिका दाखल केली होती. ग्लिट्ज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट या शोच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती.

    हे मैदान मूळ उद्देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी वापरले जात असेल तर या काळातही मैदानावर सर्वांना प्रवेशाची मुभा असायला हवी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मुंबई विभागाचे क्रीडा आणि युवक सेवा उपसंचालक पक्षपाती असून त्यांनी खेळाचे मैदान व्यावसायिक कार्यक्रमासाठी आयोजकांना उपलब्ध करून दिल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला होता.