marine drive

या आठवड्यात सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे सहा दिवस साडे चार मीटरपेक्षा उंच लाटा (High Tide For Six Days) उसळणार आहेत.

  मुंबई : समुद्राच्या भरतीसंदर्भातील (High Tide) एक मोठी बातमी समोर आली आहे. या आठवड्यात सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे सहा दिवस साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा (High Tide For Six Days) उसळणार आहेत. याच काळात अतिवृष्टी झाल्यास ठिकठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आता मुंबईकरांना (Mumbai) सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

  समुद्राने वेढलेल्या मुंबईत भरतीच्या काळात पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही. त्यामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साठते. पालिकेने या पावसाळ्यातील भरती- ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या पावसाळ्यात तब्बल २२ वेळा मोठी भरती येणार आहे. त्यापैकी जून महिन्यात समुद्राला एकूण सहा दिवस मोठी भरती असून ती या आठवड्यात आहे. त्यापैकी गुरुवारी १६ जून रोजी सर्वात मोठी भरती येणार असून त्यावेळी लाटांची उंची ४.८७ मीटर असेल.

  मुंबईतील नाल्यांमधून पावसाचे पाणी समुद्रात सोडले जाते. त्यासाठी असलेल्या १८६ पातमुखांपैकी ४५ पातमुख हे समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत. तर १३५ भरती पातळीच्या तुलनेत खाली आहेत. याचाच अर्थ केवळ सहा पातमुख हे उंचावर आहेत. त्यामुळे भरतीच्यावेळी समुद्राचे पाणी शहरात शिरते. त्यातच पाऊस पडत असेत तर पाणी साचते.

  भरतीचे वेळापत्रक

  तारीख            उंची (मीटर)    वेळ

  १३ जून २०२२   ४.५६         स ११.०८

  १४ जून २०२२   ४.७७         दु ११.५६

  १५ जून २०२२   ४.८६        दु १२.४६

  १६ जून २०२२   ४.८७         दु १.३५

  १७ जून २०२२   ४.८०        दु. २.२५

  १८ जून २०२२   ४.६६       दु १५.१६