पुण्यात विसर्जन मार्गावरील आवाजाने उडाला थरकाप, ढोल ताशांचा दणदणाट

अनेक वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा (Ganeshotsav 2022) असलेल्या पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ प्रथेप्रमाणे शुक्रवारी (९ सप्टेंबर) मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा चौकातून झाला. गुरुवारी (८ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता केळकर रस्ता परिसरात मंडळांनी विसर्जन सोहळ्यासाठीचे देखाव्यांचे रथ लावले होते.

    पुणे : यंदा पुण्यात (Pune) विसर्जन मार्गावरील (Ganpati Immersion) दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनिवर्धक, ढोल ताशांच्या (Ganeshotsav 2022) आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरात आवाजाने थरकाप उडत होता. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले.

    अनेक वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ प्रथेप्रमाणे शुक्रवारी (९ सप्टेंबर) मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा चौकातून झाला. गुरुवारी (८ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता केळकर रस्ता परिसरात मंडळांनी विसर्जन सोहळ्यासाठीचे देखाव्यांचे रथ लावले होते. मध्यरात्रीनंतर सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेतील छोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. बांबुचे अडथळे उभे करण्यात आले. विसर्जन मार्गावरुन मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळनंतर ध्वनीवर्धकांच्या दणदणाट सुरू झाला. अनेक मंडळांनी ध्वनिवर्धकासह प्रखर प्रकाशझोत सोडले होते. ध्वनिवर्धकांच्या भिंतीसमोर तरुणाई नाचत असल्याचे पाहायला मिळाले. बाजीराव रस्तामार्गे कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाने उच्च क्षमेतेचे ध्वनिवर्धकांचा वापर केला होता.

    ध्वनिवर्धकांचा दणदणाटामुळे विसर्जन मिरवणुकीतील देखावे पाहणाऱ्या भाविकांना त्रास झाला. ढोल ताशा पथकांचा आवाजाने मर्यादा ओलांडली होती. भाविकांसह स्थानिक रहिवाशांना आवाजाचा त्रास झाला. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता परिसरात सायंकाळनंतर मोठी गर्दी झाली होती. आकर्षक देखावे प्रकाश योजनेमुळे लक्षवेधी ‌ठरले होते.