हिंदी भाषेचा सर्वांनी आदर केला पाहिजे, देशात एक भाषा सूत्र केंद्राने लागू करावे, राऊतांची केंद्र सरकारवर टिका

तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं हिंदी भाषिकप्रेंमी यांनी नाराजी व्यक्त केली असून, तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. त्यामुळं यावरुन आगामी काळात वातावरण तापण्याची शक्यता आहे.

    मुंबई : दाक्षिणातील राज्य हि हिंदी किंवा अन्य भाषेचा स्विकार करत नाहीत, ते आपल्या मातृभाषेवर किंवा इंग्रजी भाषेवर ठाम असतात. अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. आता हिंदी भाषेवर पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. कारण तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं हिंदी भाषिकप्रेंमी यांनी नाराजी व्यक्त केली असून, तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. त्यामुळं यावरुन आगामी काळात वातावरण तापण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, आता या वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी भाषेवरुन संजय राऊत यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाच आव्हान दिलं आहे. एक देश, एक संविधान आणि एक भाषा हे सूत्र लागू करण्याचं आव्हान आता गृहमंत्री तसेच केंद्राने स्विकारलं पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. त्यामुळं भाषेवरुन पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. पुढे बोलतना राऊत म्हणाले की, हिंदी या भाषेचा सन्मान व्हावा. एक देश, एक संविधान आणि एक भाषा याचं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वीकारलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

    दाक्षिणातील बहुतेक राज्ये ही हिंदी भाषेला कमी लेखतात, तसेच ते कधीच हिंदी भाषेतून बोलत सुद्धा नाहीत. तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान करत हिंदी भाषा ही पाणीपुरीवाल्यांची भाषा आहे, असं म्हटलं होतं. यावरुन आता संतप्त प्रतिक्रिया येत असून, पोनमुडी यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. हिंदी ही देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळे हिंदीचा सर्वांनीच आदर केला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच मी आणि माझा पक्ष हिंदी भाषेचा सन्मान करतो. संसदेत मी हिंदीतच बोलतो. कारण देशाने माझं म्हणणं ऐकावं. म्हणून मी हिंदी बोलतो तसेच हिंदी ही देशाची भाषा आहे. त्यामुळं या भाषेचा आदर केला पाहिजे. दरम्यान, पोनमुडी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येत असून, पोनमुडी यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे.