….आता इतिहासात लघुशंका करायला लागले”, हिंदू राष्ट्रसेना प्रमुख धनंजय देसाईंची अजित पवारांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे विधान केले होते. त्या विधानानंतर राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याच दरम्यान आज पुण्यात लाल महाल ते डेक्कन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.

    पुणे – संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते म्हणणारे शाहिस्तेखान,अफजलखान यांच्या कुळातलेच असावे. धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले. कदाचित तुम्ही पवार नसला, पण छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच होते. अशा शब्दात हिंदू राष्ट्रसेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे विधान केले होते. त्या विधानानंतर राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याच दरम्यान आज पुण्यात लाल महाल ते डेक्कन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी अजित पवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. आता या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.