साताऱ्याच्या राजकारणात नव्या पक्षाची ‘एंट्री’; नागरिकांना पर्याय मिळणार?

सर्वसामान्य लोकांना वेगळा पर्याय देण्यासाठी हिंदुस्थान मानव पक्षाची निर्मिती झाली आहे. आगामी काळात शहरासह ग्रामीण भागांत पक्षाचा विस्तार करणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष ॲड. अशोकराव माने (Adv. Ashokrao Mane) यांनी केले.

    वडूज : सर्वसामान्य लोकांना वेगळा पर्याय देण्यासाठी हिंदुस्थान मानव पक्षाची (Hindustan Manav Party) निर्मिती झाली आहे. आगामी काळात शहरासह ग्रामीण भागांत पक्षाचा विस्तार करणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष ॲड. अशोकराव माने (Adv. Ashokrao Mane) यांनी केले.

    गुरसाळे (ता.खटाव) येथील भावलींग डोंगरावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रवक्ते जितेंद्र पुंडे, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख विकास भोर, उंबर्डेचे मा. ग्रा. पं. सदस्य हिंदुराव पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

    ॲड. माने म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळ होऊनसुध्दा सर्वसामान्य नागरिकांचे रस्ते, पाणी व इतर मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. ही खेदजनक गोष्ट आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांचा जीवन व जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही नव्या पक्षाची स्थापना केली आहे. पक्षाच्या माध्यमातून आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकांच्या निवडणुका ताकदीने लढविण्यात येणार आहेत.

    समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करणार : पुंडे

    सातारा जिल्ह्यात कृषी साधनांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता व्हावी. शेतकरी, शेतमजूरांच्या समस्या निराकरणासाठी शासन दरबारी पक्षाच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे, असे आश्वासन पुंडे यांनी दिले.