यांचे अस्तित्व मोदीमुळे आहे अन्यथा त्यांना ओळखत कोण? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अशिष शेलारांना टोला

निवडणुका आल्या की नाक्यावर जाऊन सभा घेणारी ही लोक असतात ज्यांची विचाराची पोच नसते त्यांनाच अशा गोष्टी सुचू शकतात. काही गोष्टी विरोधकांच्या असल्या तरी त्या मान्य केल्या पाहिजेत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठेपण दाखवत या गोष्टी मान्य करत असतील तर त्यांच्या पक्षातील छोट्या कार्यकर्त्यांना त्या कळल्या पाहिजेत. अशी सणसणीत चपराक भाजपा आमदार आशिष शेलार यांना मनसे नेते राज ठाकरे यांनी लगावली.

  • मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याने कल्याण मनसेमध्ये उत्साहाचे वातावरण

कल्याण : मनसे अध्यक्ष (MNS President) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी ठाणे जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण (Kalyan) येथे कार्यकर्ता मेळावा (Workers Meeting) घेतला. आगामी निवडणुकीच्या (Upcoming Elections) पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण असल्याचे बोलले जात आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे ठाणे जिल्हातील भूमिपुत्र आहेत. यामुळे ठाणे जिल्ह्यात पक्षाची ताकद आणखी वाढवण्याच्या दृष्टीने मनसे कामाला लागली आहे. १२ ते १५ मेदरम्यान हा दौरा सुरु असून ठाणे जिल्हातील ग्रामीण भाग करत बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणात रविवारी दौरा संपन्न झाला. दुपारी खडकपाडा येथे मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदाघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर खडकपाडा स्पिग्र टाईम हॉटेल येथे मनसे कार्यक्रर्ता मेळावा संपन्न झाला. त्यानंतर पत्रकारांनी मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांना कल्याणातील मनसे पक्ष कार्यकारणी बाबत छेडले असता कल्याणात मनसे मध्ये कुठलाही गट तट नसून मनसे कार्यकारणीचे काम सुरू आहे.

निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी ही लोकं – राज ठाकरेनी आशिष शेलारना सुनावले

निवडणुका आल्या की नाक्यावर जाऊन सभा घेणारी ही लोक असतात ज्यांची विचाराची पोच नसते त्यांनाच अशा गोष्टी सुचू शकतात. काही गोष्टी विरोधकांच्या असल्या तरी त्या मान्य केल्या पाहिजेत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठेपण दाखवत या गोष्टी मान्य करत असतील तर त्यांच्या पक्षातील छोट्या कार्यकर्त्यांना त्या कळल्या पाहिजेत. अशी सणसणीत चपराक भाजपा आमदार आशिष शेलार यांना मनसे नेते राज ठाकरे यांनी लगावली. कर्नाटक मधील काँग्रेसच्या विजयावर बोलताना राज ठाकरे यांनी भाजपच्या वागणुकीचा हा पराभव असल्याचे म्हटले होते यावर आशिष शेलार यांनी घरात बसून स्वप्न पाहणार्यांनी स्वप्नातल्या प्रतिक्रिया देऊ नये असे विधान करत राज ठाकरे यांना टोचले होते. यांनतर ठाणे जिल्ह्याच्या दौर्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी कल्याणात पत्रकाराशी संवाद साधला यावेळी त्यांनी आशिष शेलार यांना छोटे नाक्यावर सभा घेणारे लोक या शब्दात फटकारले.

यावेळी पुढे बोल्ताना त्यांनी भारत जोडो यात्रेचा परिणाम भाजपने कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी तो कर्नाटकात दिसल्याचा पुनरुच्चार करताना पराभव मोठ्या मानाने मान्य करा असे आवाहन केले. तर पराभवातून काही बोध घ्यायचा नसेल तर वागा तसेच अशा कानपिचक्या देखील दिल्या. तर राज ठाकरे अस्तित्व दाखविण्यासाठी प्रतिक्रिया देत असल्याच्या आरोपाचा समाचार घेताना त्यांनी हे कोण? यांचे अस्तित्व मोदीमुळे आहे अन्यथा त्यांना ओळखत कोण? असा सवाल करत त्यांची खिल्ली उडवली. तर ही अतिशय छोटी माणसे असून त्यांच्या वाटयाला मी जात नसल्याचे सांगत आशिष शेलार यांना सुनावले.