“हिसाब तो लेकर रहेंगे…”, भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अनिल परब यांना गर्भित इशारा, सोमय्या म्हणतात…

आज पुन्हा एकदा सोमय्या यांनी अनिल परब यांना गर्भित इशारा दिला आहे. म्हाडा येथील कार्यालयाबाबत किरीट सोमय्यांचे सर्व आरोप खोटे असून सोमय्या तोडांवर आपटले असा आरोप अनिल परब यांनी केला होता. या आरोपाला  किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं.

    मुंबई- मुंबई- माजी मंत्री व ठाकरे गटाते आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. आधी नोटीस दिली होती, म्हाडा यावर कारवाई करणार होती, परंतु सोमवारीच कार्यवाही झाली. तसेच मला आशा आहे की, आता रिसॉर्ट पण अशाच पद्धतीने तुटणार आहे. अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. यानंतर माजी परिवहन मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे नाटय रंगले आहे.

    दरम्यान, काल वांद्रे येथील कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले आहे. याची काल भाजप नेते किरीट सोमय्या दुपारी या ठिकाणी भेट देणार होते, त्यावेळी सोमय्यांची गाडीचा ताफा पोलिसांनी बीकेसीजवळ अडवला होता. त्यामुळं वातावरण तापले होते. यानंतर आज पुन्हा एकदा सोमय्या यांनी अनिल परब यांना गर्भित इशारा दिला आहे. म्हाडा येथील कार्यालयाबाबत किरीट सोमय्यांचे सर्व आरोप खोटे असून सोमय्या तोडांवर आपटले असा आरोप अनिल परब यांनी केला होता. या आरोपाला  किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं.

    किरीट सोमय्या यांनी बोलताना कार्यालय म्हणून कोण ही जागा वापरत होतं. अनधिकृत जागेची कुणाची मालकी असते का? असा सवाल केला म्हणून म्हाडाच्या मुख्याधिकार्याना एम आरटीपीवर खटला दाखल करा सांगितले. २०१९ जून मध्ये अनिल परब यांनी नोटीस दिली होती. जाग यायला ३६ महिने लागले. हिसाब तो लेकर रहेंगे. हेच नटवरलाल दापोली साई रिसॉर्टमध्ये माझा काही सबंध नाही असे सांगितले होते.  नटवरलालवर सहा गुन्हे दाखल झाले. भ्रष्टाचार करून हॉटेल गाळे बांधले त्याचा हिशोब द्यावाच लागणार, तसेच हिसाब तो लेकर रहेंगे, असा इशारा सोमय्यांनी अनिल परब यांना दिला आहे.