Maharashtra Political Crisis : ‘ही’ तर इतिहासाचीच पुनरावृत्ती; सत्तेचा कंट्रोल थेट ‘मातोश्री’कडे

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला रिकामा केला आणि मातोश्री गाठले. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. वरळीत तर शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या गाडीतून उतरले. शिवसैनिकांचे आभार मानून ते गाडीत बसले तेव्हा अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीच्या ताफ्यामागे धाव घेत संरक्षणकडे तयार केले होते.

    मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) ३४ आमदारांना (34 MLA) घेऊन सुरत (Surat) गाठले. हा शिवसेनेला मोठा धक्का आहे. पक्ष वाचवायचा की सत्ता या संभ्रमात असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल आपले शासकीय निवासस्थान वर्षा बंगला (Government Home, Varsha Banglow) सोडला. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा वर्षा बंगल्यावर जाणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला रिकामा केला आणि मातोश्री गाठले. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. वरळीत तर शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या गाडीतून उतरले. शिवसैनिकांचे आभार मानून ते गाडीत बसले तेव्हा अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीच्या ताफ्यामागे धाव घेत संरक्षणकडे तयार केले होते.

    कालच्या दिवसभरातील घडामोडीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आहे. या बंगल्याच्या बाजूला मुख्यमंत्री यांचे सचिवालय आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला मुक्काम मातोश्री हलविला असला तरी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे ते कधीही वर्षा निवासस्थानी जाऊ शकतात अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

    वर्षा बंगल्याशेजारीच अनेक मंत्र्यांचे बंगले आहेत. काही अडचणी निर्माण झाल्यास मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगला हे अन्य मंत्र्यासाठी सोयीचे ठिकाण होते. मात्र, आता या मंत्र्यांना मातोश्रीवर हजेरी लावली लागणार आहे. १९९५ साली शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता आली असताना त्या सत्तेचा रिमोट कंट्रोल हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती होता. त्यावेळची राजसत्तेची सूत्रे ही मातोश्रीवरूनच हलत होती. आताही शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला मुक्काम वर्षा येथून मातोश्रीवर हलविला आहे. त्यामुळे आता राज्याच्या सत्तेचा थेट कंट्रोल मातोश्रीच्या हाती आला आहे.