पुणेकरांना फटका! ‘पीएमपीएल’चा मोठा निर्णय पुण्यातील 11 मार्गावरील पीएमपीएल बंद

  पुण्याची सार्वजनिक वाहतुक PMPML च्या नावाने विविध तक्रारी येतात, त्यात काही नवीन नाही. ट्रॉफीक, वेळापत्रक, टिकीट दर, सुरक्षा यावर अनेक प्रश्न उपस्थित होतचं असताता. पण PMPML कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला हे. पुण्यात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी, नोकरीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तरी पीएमपीएल मधूल प्रवास करण हेचं सोयीचं किंवा परवडणार आहे.  पण उद्यापासून म्हणजेच २६ नोव्हेंबर पासून पुण्यातील ग्रामीण भागातील तब्बल अकरा मार्गावर पीएमपीएल बसेस धावणार नाही असा निर्णय पीएमपीएल प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तर हा निर्णय पुणे ग्रामीण भागातील नागरिकांना यांचा मोठा फटका बसणार आहे.

  जाणून घ्या कुठल्या भागातील पीएमपीएल सेवा बंद होणार:-

  • स्वारगेट ते काशिंगगाव
  • स्वारगेट ते बेलावडे
  • कापूरहोळ ते सासवड
  • कात्रज ते विंझर
  • सासवड ते उरुळी कांचन
  • हडपसर ते मोरगाव
  • हडपसर ते जेजुरी
  • मार्केटयार्ड ते खारावडे
  • वाघोली ते राहूगाव, पारगाव
  • चाकण ते शिक्रापूर फाटा
  • सासवड ते यवत