नियम माेडणाऱ्या वाहनचालकानंा दणका ; इस्लामपुरात दिवसांत तब्बल १ लाखांचा दंड वसूल

वाहतुक नियमांचे उल्लंघन केलेल्या दुचाकीस्वारांकडून इस्लामपूर पोलिसांनी एका दिवसांत तब्बल एक लाख रुपये दंड वसूल केला आहे.१५० हून अधिक वाहन चालक-मालकांवर ही कारवाई झाली. इस्लामपूर पोलीस ठाणे व वाहतुक शाखा इस्लामपूर यांचे सयुंक्त विद्यमाने इस्लामपूर शहरातील सत्रे चौक, कामेरी नाका, कापुसखेड नाका, एस.टी.स्टॅण्ड, के.बी.पी. कॉलेज परिसर या ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन मोठया प्रमाणात होत होते.

    इस्लामपूर : वाहतुक नियमांचे उल्लंघन केलेल्या दुचाकीस्वारांकडून इस्लामपूर पोलिसांनी एका दिवसांत तब्बल एक लाख रुपये दंड वसूल केला आहे.१५० हून अधिक वाहन चालक-मालकांवर ही कारवाई झाली. इस्लामपूर पोलीस ठाणे व वाहतुक शाखा इस्लामपूर यांचे सयुंक्त विद्यमाने इस्लामपूर शहरातील सत्रे चौक, कामेरी नाका, कापुसखेड नाका, एस.टी.स्टॅण्ड, के.बी.पी. कॉलेज परिसर या ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन मोठया प्रमाणात होत होते. शाळेला जाणारी १८ वर्षा खालील मुले-मुली बिनधास्त वाहने चालवित असलेले निदर्शनास आले होते. इस्लामपूर शहरात वाहतूकीस शिस्त लागण्या करीता इस्लामपूर पोलीसांनी वाहन चालक-मालक यांचेवर कारवाई केली आहे. त्यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट, ट्रीपल सीट, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, विना नंबरप्लेट, विना कामदपत्र, विना लासन्सस या वाहन चालकांचेवर कारवाई केली.  सर्व वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात आणली होती.  त्यांचेवर दंडात्मक कारवाई केल्यावर वाहने परत मालकांचे ताब्यात देण्यात आली.

    उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर  सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने, हरिशचंद गावडे, सागर वरुटे तसेच ३५ पोलीस कर्मचारी व २० होमगार्ड सहभागी होते.

    कारवाईत चोरीच्या दुचाकी मिळाल्या .?
    इस्लामपूर शहरात सर्वत्र पोलीस दुचाकीस्वारांवर कारवाई करत होते. दरम्यान केबीपी कॉलेज समोर पोलीसाना अज्ञात एक दुचाकी मिळाली. हिरो होंडा सीडी १०० गाडीच्या नंबर प्लेटवर ट्रॅक्टरचा नंबर असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे ही गाडी चोरीची असावी असे पोलिसांचे म्हणणे आहे. इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात चोरीस गेलेली मोटार सायकलही कारवाई दरम्यान सापडली आहे.

    इस्लामपूर शहरात व ग्रामिण भागात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कारवाईची मोहीम गतीमान केली जाईल. आठवडयातून दोन वेळी कधीही अशी मोठी कारवाई करण्यात येईल. तरी वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम मोडून वाहने चालवू नये अन्यथा कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

    -संजय हारुगडे, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर पोलीस ठाणे