संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

देशभरात वाहन कुठेही गेले तरी ते ओळखता यावे, यासाठी वाहन क्रमांक एकाच म्हणजे इंग्रजी भाषेत असावे, असा नियम आहे. असे क्रमांक न आढळल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र मराठीत वाहन क्रमांक (Marathi Number Plate) ठेवणे गुन्हा नाही, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी एका नागरिकाच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

    मुंबई : देशभरात वाहन कुठेही गेले तरी ते ओळखता यावे, यासाठी वाहन क्रमांक एकाच म्हणजे इंग्रजी भाषेत असावे, असा नियम आहे. असे क्रमांक न आढळल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र मराठीत वाहन क्रमांक (Marathi Number Plate) ठेवणे गुन्हा नाही, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी एका नागरिकाच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

    वाहतूक पोलिसांनी दिलेल्या या उत्तरामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे गुन्हा नाही म्हणताना दुसरीकडे वाहन क्रमांक मोटार वाहन कायदा 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 प्रमाणेच असायला हवा, असे नमूद करण्यात आले आहे. वाहन क्रमांक रोमन लिपीमध्ये असणे आवश्यक

    आहे. महाराष्ट्रामध्ये मालकाची इच्छा असल्यास रोमनमधील क्रमांकाव्यतिरिक्त देवनागरी लिपीसाठी जास्तीची वाहन क्रमांक प्लेट वापरता येईल. परंतु, हे चिन्ह रोमन चिन्हाचे भाषांतर असावे, असे मोटार वाहन कायदा 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 नुसार परिवहन विभागाचे आदेश आहेत.

    MH 12 A 2526 हा वाहन क्रमांक महा 12 अ 2526 असा न लिहिता एमएच 12 ए 2526 अशा प्रकारे लिहावा, असा नियम आहे. तरीही केवळ मराठी वाहन क्रमांक ठेवणे हा गुन्हा नसल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी एका उत्तरात म्हटले आहे. अतिरिक्त वाहन क्रमांक प्लेट असा कुठेही उल्लेख यामध्ये केलेला नाही.