गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात राहणाऱ्या मतदारांना सुट्टी; शिंदे सरकारचा निर्णय

खासगी आणि शासकीय संस्थांना आपल्या गुजराती कर्मचाऱ्यांना १ आणि ५ डिसेंबर रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने जारी केलेल्या जीआरनुसार, राज्यातील पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे जिल्ह्यांतील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे, अशा सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्यात यावा, यासाठी या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    मुंबई – येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभेची निवडणूक (Gujarat Election) होत आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती कर्मचाऱ्यांना (Gujarati Workers) भरपगारी सुट्टी (Paid Vacation) जाहीर करण्यात आली आहे. शिंदे सरकारने (Government Of Maharashtra) हा निर्णय घेतला असून याबाबत शासननिर्णयही जारी करण्यात आला आहे. सर्व खासगी आणि शासकीय संस्थांना हा आदेश लागू असणार आहे.

    खासगी आणि शासकीय संस्थांना आपल्या गुजराती कर्मचाऱ्यांना १ आणि ५ डिसेंबर रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने जारी केलेल्या जीआरनुसार, राज्यातील पालघर (Palghar), नाशिक (Nashik), नंदूरबार (Nandurbar), धुळे जिल्ह्यांतील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे, अशा सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्यात यावा, यासाठी या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. यात म्हटले आहे की, गुजरात विधानसभेसाठी येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणूकीमध्ये राज्यातील पालघर, नाशिक, नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यांसह ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हे आदेश देण्यात येत आहेत.

    सुट्टी, सवलत न दिल्यास कारवाई
    उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी शासन निर्णयाचे पालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही देण्यात आला आहे.