home guard attack by climbing wireless tower vadki police station type

बालू केराम (Balu Keram ) असे विरुगिरी करणाऱ्याचे नाव आहे. बालू हा वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत होमगार्ड म्हणून काम करत होता. मात्र, माझं काम असतांनाही मला कामावर पाठवत नसून माझ्यावर दोन पोलीस कर्मचारी अन्याय करीत असल्याचा टॉवरवर चढून जोरजोरात ओरडत होता. तसेच टॉवरवरून उडी मारून आत्महत्या (suicide) करतो म्हणून धमकी देत होता.

    यवतमाळ : जिल्ह्यातील वडकी पोलीस स्टेशनमध्ये (Vadki Police Station) कार्यरत असलेल्या होमगार्डने पोलीस स्टेशनच्या (Police Station by Home Guard) वायरलेस टॉवरवर चढून (climbing a wireless tower) एक ते दीड तास विरुगिरी (Virugiri ) केली. हा प्रकार आज सकाळी १० ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडला. यावेळी पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

    बालू केराम (Balu Keram ) असे विरुगिरी करणाऱ्याचे नाव आहे. बालू हा वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत होमगार्ड म्हणून काम करत होता. मात्र, माझं काम असतांनाही मला कामावर पाठवत नसून माझ्यावर दोन पोलीस कर्मचारी अन्याय करीत असल्याचा टॉवरवर चढून जोरजोरात ओरडत होता. तसेच टॉवरवरून उडी मारून आत्महत्या (suicide) करतो म्हणून धमकी देत होता.

    मात्र, त्याला खाली उतरविण्यासाठी पोलीस कर्मचारी त्याची समजूत घालत होता. तरी तो उतरण्यास तयार नव्हता. तेव्हा ही माहिती बालुच्या घरच्यांना दिली. घरची मंडळी आल्यानंतर त्याची समजूत काढून त्याला खाली उतरविले  व त्यानंतर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांनी कक्षेत नेवून समजावून सांगितले व त्याला शांत केले.