मराठा आंदोलकांवरील ‘हे’ गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत: गृहमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट

हमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेणार नसल्याचे देखील फडणवीस म्हणाले आहेत.

    नागपूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यव्यापी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने (State Govt) मान्य केल्या. याबाबत जीआर (Reservation GR) काढल्याने सर्व मराठा बांधव जल्लोष व्यक्त करत आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीमध्ये सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे अशी देखील प्रमुख मागणी होती. याबद्दल गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेणार नसल्याचे देखील फडणवीस म्हणाले आहेत.

    नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरील राज्य सरकारने काढलेल्या मार्गाचे कौतुक करत मराठा समाजाला शुभेच्छा दिल्या. तसेच राज्य सरकारने काढलेल्या जीआरचे देखील स्पष्टीकरण दिले. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाही किंवा काहीच पुरावा नाही त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही असे देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय राज्य सरकार करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी फडणवीसांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठा आंदोलकांवर जिथे-जिथे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतरवाली सराटी असो किंवा इतर ठिकाणचे गुन्हे निश्चितच मागे घेतले जातील. परंतु, घरं जाळल्याची प्रकरणं, पोलिसांवर थेट हल्ला, इतर वास्तूंची जाळपोळ करणे, बसेसची जाळपोळ करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांसंदर्भात आपल्याला (राज्य सरकार) निर्णय घेता येत नाही. न्यायालयाच्या आदेशाशिवाय आपण यामध्ये काहीच करू शकत नाही, आपण ते गुन्हे मागे घेऊ शकत नाही. त्यामुळे ते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. इतर गुन्हे आपण मागे घेत आहोत.” असे स्पष्ट मत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. त्यामुळे गुन्हांची टांगती तलवार अजूनही मराठा आंदोलकांवर आहे.