कल्याणमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये गुंडगिरी, एपीएमसी मार्केटमध्ये गुंडगिरी करुन विक्रेत्यांकडून केले पैसे वसूल

गुड्डू राजभर हे या संस्थेचे अध्यक्ष आहे. या युनियनच्या उद्घाटन प्रसंगी कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, एपीएमसी संचालक आणि माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

    कल्याण : मेहनत करीत नाहीत. गरीबांना त्रास देतात. गुंडगिरी आणि छप्परगिरी करतात असे लोकांना सांगतो. तुम जिस स्कूल मे पढते हो उस स्कूल के हम हेडमास्टर है. हमने हत्यार कब के फेक दिये है. लेकीन चलाना भुले नही है. त्यामुळे येत्या काळात तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा जबाब मिळेल असा सज्जड दम शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी एपीएमसी मार्केटमध्ये गुंडगिरी करुन विक्रेत्यांकडून पैसे वसूल करणाऱ्याना दिला आहे.
    एका युनियनच्या उदघाटनाप्रसंगी महेश गायकवाड यांनी हे विधान केले आहे. एपीएमसीमधील व्यापाऱ्यांना काही लोक जाणीवपूर्वक त्रास देऊन पैसे वसूल करीत आहेत. त्याला एपीएमसी प्रशासनाचा पाठिंबा आहे असे सांगितले जाते. कल्याणमधील एपीएमसी मार्केटमध्ये फूल मार्केट आहे. या फूल मार्केटमध्ये फूलविक्रेते हे महापालिकेचे भाडेकरु आहेत. हे फूल विक्रेते महापालिकेला भाडे देतात. फूल विक्रेते महापालिकेस भाडे भरून देखील काही लोक त्यांना त्रास देऊन त्यांच्याकडून जबरदस्ताने पैसे वसूली करतात. हा अत्याचार थांबविण्याकरीता कल्याणमधील काही फूल विक्रेत्यासह अन्य व्यापाऱ्यांनी एका युनियनची स्थापना केली. जयहिंद कल्याण फूल मार्केट व्यापारी संघटना असे या युनियनचे नाव आहे.
    गुड्डू राजभर हे या संस्थेचे अध्यक्ष आहे. या युनियनच्या उद्घाटन प्रसंगी कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, एपीएमसी संचालक आणि माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी महेश गायकवाड यांनी फूल मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून पैसे वसूल करुन त्रास देणाऱ्यांना चांगलाच दम दिला आहे. या पूढे कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. व्यापाऱ्यांसोबत हे घडत असेल तर हे अतिशय धक्कादायक आहे. एपीएमसी प्रशासनाच्या  संगनमताने हे प्रकार घडत असल्याने त्यांच्या विरोधात काराई काय केली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.