शेतात आयोजित केलेला बर्थ डे पार्टीत घडली भयानक घटना; अनेक मित्र पार्टी सोडून पळून गेले

शेतात आयोजित केलेला मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बोरी येथे १५ मे रोजी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सतीश कल्याण चौधरी (२७) असे मृत युवकाचे नाव आहे(Horrible incident happened at a birthday party held in a field).

    परभणी : शेतात आयोजित केलेला मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बोरी येथे १५ मे रोजी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सतीश कल्याण चौधरी (२७) असे मृत युवकाचे नाव आहे(Horrible incident happened at a birthday party held in a field).

    बोरी येथील बाळासाहेब खापरे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील अवधेश ठाकूर यांच्या शेतातील आखाड्यावर १५ मे रोजी मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये ३५ ते ४० जणांचा सहभाग होता. याच ठिकाणी असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने सतीश कल्याण चौधरी हा विहिरीत पडला.

    काही जणांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर विशाल ईखे यांनी तत्काळ विहिरीमध्ये उडी मारून दोरीच्या सहाय्याने सतीश चौधरी यास काठावर घेतले. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु घटनेनंतर काही जण पार्टी सोडून पळून गेले, असे गजानन चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

    सतीश चौधरी याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली होती. त्यानंतर गजानन चौधरी यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब खापरे, अवधेश ठाकूर, संदीप कदम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.