
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime in Maharashtra) अनेक घटना समोर येताना दिसत आहे. त्यात आता अहमदनगर जिल्ह्यातील वळदगाव (Valadgaon Crime) येथे खळबळजनक घटना घडली. एका व्यक्तीने त्याच्या पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime in Maharashtra) अनेक घटना समोर येताना दिसत आहे. त्यात आता अहमदनगर जिल्ह्यातील वळदगाव (Valadgaon Crime) येथे खळबळजनक घटना घडली. एका व्यक्तीने त्याच्या पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने पत्नीवर असलेल्या केवळ संशयावरूनच हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.
वाळूज औद्योगिक परिसरातील वळदगाव येथे ही घटना घडली. या परिसरातील एका घरात पती, पत्नी व चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. यातील धक्कादायक बाब म्हणजे लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने घराशेजारीच सासुरवाडीत असलेल्या पत्नीला घरी नेऊन संशयखोर पतीने तिचा व चार वर्षांच्या मुलीचा खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मोहन प्रताप डांगर-राजपूत (29) असे या व्यक्तीचे नाव असून, पूजा राजपूत (26) असे पत्नीचे तर श्रेया असे चार वर्षीय मुलीचे नाव आहे. आई व मुलीला एकाच दोरीने गळफास दिल्याचे घटनास्थळी दिसून आले. विशेष म्हणजे पतीने यापूर्वीही पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
केकची आवड ठरली जीवास कारणीभूत
आजीच्या घरी असलेल्या चिमुकली श्रेयाने वडिलांच्या घरी जाण्याचा हट्ट केला. आवडत्या केकसाठी ती आई-वडिलांसोबत गेली. त्यानंतर नेमकं त्याच दिवशी मोहन प्रताप डांगर-राजपूत याने पत्नी आणि मुलीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.