Horrible! मुंबईत गोवरचा १३ वा मृत्यू; गाेवरचे १९ नवे १६१ संशयित रुग्ण

  मुंबई : गोवरने (Measles) गुरुवारी आणखी एका बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे गोवरच्या मृत्यूंची (Death) संख्या १३ झाली असून, यामध्ये मुंबईतील (Mumbai) १० तर मुंबईबाहेरील तीन बाळांचा समावेश आहे. यातील एक मृत्यू गोवर संशयति आहे. गुरुवारी मृत्यू झालेला मुलगा गाेवंडीमधील (Govandi) आहे. तसेच गुरुवारी गोवरचे १९ नवे रुग्ण आढळले असून, गोवर रुग्णांची संख्या २५२ इतकी झाली आहे. तसेच १६१ संशयति रुग्ण आढळले आहेत.

  मुंबईतील गोवरच्या संख्येबरोबरच मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. मुंबईमध्ये सलग चार दविस गोवरने बाळाचा मृत्यू होत आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात गाेवंडी येथे राहत असलेल्या आठ महिन्याच्या बाळावर गोवरचे उपचार सुरू होते. २० नोव्हेंबरला त्याला ताप व पुरळ येऊन त्याला श्वास घेण्यास त्रास हाेता. त्यामुळे त्याला पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  २१ नाेव्हेंबरला रुग्णाची अवस्था सुधारत नसल्यामुळे त्याला विशेष रुग्णालयात संध्याकाळी स्थलांतरीत करुन तिथे रुग्णाला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. २४ नाेव्हेंबरला सर्व अत्यावश्यक उपचार करुनही रुग्णाची स्थतिी खालावत जात हाेती व गुरुवारी दुपारी १ वा. १०मिनिटाने बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहतिी पािलका आलेराेग्य विभागाने दिली आहे. आतापर्यंत लसीकरण झाले हाेते.

  पण गाेवर लागणमुळे अवयव निकामी, श्वास घेण्यास त्रास व कुपाेषण असे मृत्यू मागील कारणे असल्याचे विभागाकडून सांगण्यात आलेले. या मृत्यूमुळे मुंबईतील मृतांची संख्या १३ झाली आहे. यामध्ये मुंबईतील १० तर मुंबईबाहेरील तीन बाळांचा समावेश आहे. यातील एक मृत्यू गोवर संशयित आहे.

  गुरुवारी मुंबईत १९ रुग्ण सापडले

  मुंबईमध्ये गुरुवारी १९ गोवरचे रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या २५२ इतकी झाली आहे. गुरुवारी सापडलेल्या १९ रुग्णांपैकी सर्वाधिक तीन रुग्ण एम पश्चिम या विभागातील असून एल (२), एम पूर्व(२), के पश्चिम (२), ई(२), जी दक्षिण (२), सी(१), डी(१), पी दक्षिण (१),एन (१), एस (१), टी (१)असे रुग्ण आलेढळून आलेले आलेहेत. याशिवाय १६१ संशयित रुग्ण सापडल्याने संशयित रुग्णांची संख्या ३६९५ इतकी झाली आहे. संशयति रुग्णांना जीवनसत्त्व अ च्या दोन मात्रा २४ तासांच्या अंतराने देण्यात येत असल्याची माहिती आलेराेग्य विभागाने दिली आहे.

  गाेवरचे आतापर्यंत रुग्ण आढळून आलेले विभाग

  शहर- ई,एफ उत्तर, जी उत्तर, जी दक्षिण
  पश्चिम उपनगर -एच पूर्व, के पूर्व, पी उत्तर
  पूर्व उपनगरे – एल, एम पूर्व, एम पश्चिम, एस

  घराेघरी ताप व पुरळ रुग्णांचे सर्वेक्षण

  मुंबईतील एकूण घरांचे सर्वेक्षण १०२९४१२ (गुरुवारी ) ४६०३३८८ (मागील काही दिवसांपासून)
  एकूण ताप व पुरळचे रुग्ण १६१ (गुरुवारी) ३६९५( आतापर्यंत)

  रुग्णालयातील गाेवरच्या रुग्णांची स्थिती (गुरुवार)

  रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण – ३४
  रुग्णालयातून घरी साेडण्यात आलेलेले रुग्ण -३६
  व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण -२
  मृत्यू – १