रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी नागपूर (Ratanagiri Nagpur) राष्ट्रीय महामार्गावर (Highway) मिरजेजवळ (miraj) मोठा अपघात घडला आहे. जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन पाचजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

    सांगली : मागील काही दिवसांपासून राज्यातील अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. रविवारी राज्यात दोन तीन ठिकाणी अपघात झाल्याची घटना ताजी असताना, आता रत्नागिरी नागपूर (Ratanagiri Nagpur) राष्ट्रीय महामार्गावर (Highway) मिरजेजवळ (miraj) मोठा अपघात घडला आहे. जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन पाचजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू…

    दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिह्यातील राधानगरीजवळ असलेल्या सरवडेचे सर्व मृत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील सातजण जीपमधून सोलापूरकडे जात होते. चुकीच्या साईडने जाणाऱ्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि जीपची समोरासमोर धडक झाली. मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहे.

    जखमींवर उपचार सुरु…

    या अपघातानंतर बघ्याची मोठी गर्दी जमा झाली आहे. तसेच या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर, दोनजण गंभीररित्या जखणी झाले आहेत. सध्या जखमींवर उपचार सुर आहेत.