पालघर चिंचणी येथील समुद्रकिनाऱ्यावर भीषण अपघात

चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर यापूर्वी देखील स्टंट करताना अनेक अपघात घडले असून समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    पालघर – पालघरमधील चिंचणी येथील समुद्रकिनाऱ्यावर भरधाव कारमध्ये स्टंट करणाऱ्या चार तरुणांना हा स्टंट चांगलाच आगाशी आला आहे. भरधाव कार समुद्रकिनाऱ्यावर चालवत असताना कारचा टायर फुटल्याने भीषण असा अपघात झाला. या अपघातात कार मधील चार जण किरकोळ जखमी झाले असून कार पलटी झाल्याने कारच मोठं नुकसान झाल आहे. हे चारही तरुण बोईसर मधील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान ही कार पलटी झाली त्यावेळेस सुदैवाने कार जवळ इतर पर्यटक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

    चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर यापूर्वी देखील स्टंट करताना अनेक अपघात घडले असून समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी फक्त कागदावरच असल्याच समोर येत आहे. आज झालेल्या भीषण अपघातानंतर स्थानिकांसह वाणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणांना सुखरूप बाहेर काढल. मात्र अशा दुर्घटना वारंवार चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर घडू नये म्हणून पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागात काय कार्यवाही करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.