रुग्णालयीन स्वच्छता होणार अधिक पारदर्शक; बेडशिटच्या रंगांवरूनच समजणार... (Photo : iStock)
नागपूर : राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि संक्रमण नियंत्रणासाठी एक अभिनय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीट्सचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे कोणत्या दिवशी बेडशीट बदलली आहे, हे सहज लक्षात येईल आणि रुग्णालयीन स्वच्छता अधिक पारदर्शक होणार आहे.
बेडशिट्सच्या या रंग-प्रणालीमुळे वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांना बेडशीट बदलण्याची प्रक्रिया स्पष्ट दिसेल, दररोज निर्जंतुक व स्वच्छ चादरींचा वापर केल्याने संक्रमणजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय बेडशीट्स, उशांचे कव्हर, सॉकेट, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे गणवेश, पडदे, टॉवेल आदी सर्व वस्त्रांची धुलाई आता पूर्णतः यांत्रिक आणि निर्जंतुक पद्धतीने करण्यात येणार आहे. उच्च तापमानात कपड्यांची स्वयंचलित भुलाई होणार असल्याने मानवी हस्तक्षेप टाळला जाईल आणि मापदंड राखणे हे उद्दिष्ट आहे.
दरम्यान, रंग-प्रणाली आणि यांत्रिक धुलाईमुळे संक्रमणजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत होईल. ही योजना रुग्णालयीन वातावरण अधिक आरोग्यदायी आणि रुग्ण-स्नेही करेल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृती राठोड यांनी सांगितले.






