CRIME

खोराटवाडी (ता. आजरा) येथील अभिजित येजरे यांच्या किराणा दुकानांमध्ये रविवारी रात्री लक्ष्मी पूजन करण्यात आले. पुजलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह ९० हजारांवर रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. या घटनेने भादवण परिसरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.

    उत्तूर : खोराटवाडी (ता. आजरा) येथील अभिजित येजरे यांच्या किराणा दुकानांमध्ये रविवारी रात्री लक्ष्मी पूजन करण्यात आले. पुजलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह ९० हजारांवर रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. या घटनेने भादवण परिसरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.

    खोराटवाडी (ता. आजरा) येथे अभिजीत आनंदराव येजरे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. लक्ष्मीपूजनानिमित्त दुकानांमध्ये पूजा केली होती. पूजेकरता घरातील सोन्याचे दागिने व दुकानातील रोकड रुपये ९० हजारावर वापरण्यात आली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास ते दुकान बंद करू घरी झोपण्यासाठी निघून गेले. दरम्यान सकाळी दुकान उघडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पूजनासाठी वापरण्यात आलेले दागिने व रोकड लंपास केल्याचे िदसून अाले. दुकानावरील कौले काढून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. आजरा पोलिसांना  घटनेची माहिती देण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आजरा पोलीस चोट्यांचा शोध घेत आहेत.