संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून गृहपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना करडी येथे शनिवारी (दि. 11) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. शरद बंडू तितीरमारे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली.

    मोहाडी : शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून गृहपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना करडी येथे शनिवारी (दि. 11) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. शरद बंडू तितीरमारे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यावेळी त्यांच्या घरात कोणीच नव्हते. शरद तितीरमारे हे मोलमजुरीचे काम करतात. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत त्यांना सूचना दिली.

    घरातून धूर निघत असल्याने आग लागल्याचे नागरिकांना लक्षात आले. नागरिकांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. घरातील उर्वरीत साहित्य बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत घरातील फ्रिज, अन्नधान्य व जीवन उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.

    तलाठी अमृते, मंडळ अधिकारी देशमुख व कोतवाल साठवणे यांनी घटनास्थळावर तत्काळ धाव घेऊन पंचनामा केला. पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.