काम तीन कोटी चाळीस लाखांचे आणि भ्रष्टाचार नऊ कोटींचा कसा काय? आमदार चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

खडसे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने नऊ कोटी रुपये कामे न करता बीले काढल्याच आरोप केलेला होता. यावर आमदार पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

  मुक्ताईनगर – माझा भाचा उज्वल बोरसे याने नवे बोरखेडा -उंबरा ते जोंधणखेडा आणि मच्छिंद्रनाथ मंदिर असा रस्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तयार केलेला असून हा रस्ता तीन कोटी चाळीस लक्ष रुपयांना मंजूर होता, मग नऊ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला कसा? असा पलटवार करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री व विधान परिषदेच्या आमदार एकनाथराव खडसे यांना यांची मानसिकता ठिकाणावर आहे काय असा प्रति प्रश्न केला.

  खडसे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने नऊ कोटी रुपये कामे न करता बीले काढल्याच आरोप केलेला होता. यावर आमदार पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

  सदर कामाची संयुक्त चौकशी समितीने सखोल चौकशी केलेली असून त्या संदर्भात अहवाल देखील सादर केलेला आहे आणि सदर रस्ता सुस्थितीत, रहदारीस योग्य असल्याचे म्हटलेले असताना खडसे यांचा आरोप केवळ माझ्या भाच्याची बदनामी करण्याचा प्रकार आहे.सदर खोट्या आरोपाला उत्तर देणे संयुक्तिक वाटत नसले तरी वस्तूस्थिती जनतेसमोर येण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

  खडसे यांनी आपल्यावर पाच कोटी रुपयांचा निधी परत पाठवण्याचा आरोप केला आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी सांगितले की, हो मी निधी परत पाठवला आहे, परंतु त्यापैकी अडीच कोटी रुपयांचा निधी केवळ खडसे यांच्या शैक्षणिक संस्था व मंगल कार्यालयाच्या उपयोगासाठी आणण्यात आलेला होता. त्यामध्ये ६९० गट नंबर मध्ये पेवर ब्लॉक बसवणे १५ लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथील सायन्स कॉलेज नजीक १००० मीटर रस्त्याचे ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे २५ लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथे विज्ञान कॉलेज नजीक व्यायाम शाळा बांधकाम करणे ३५ लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथे गट नंबर ६९९ मध्ये मल्टीपर्पज हॉल बांधकाम करणे ५० लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथे मंगल कार्यालय नजीक पेवर ब्लॉक बसवणे दहा लक्ष रुपये, पुनर्वसन टप्पा क्रमांक तीन मध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे २० लक्ष रुपये आणि गट नंबर १२० च्या एक मध्ये विद्यालया नजीक मल्टीपर्पज हॉल बांधणे पन्नास लक्ष रुपये, हे जवळपास अडीच कोटी रुपयांची कामे खडसे यांच्या वैयक्तिक संस्थेच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार होते.

  यामध्ये गोदावरी मंगल कार्यालया चा देखील उल्लेख करत मंगल कार्यालयाचे बांधकाम खासदार व आमदार निधीतून करण्यात आला असून या मंगल कार्यालयातून वर्षभर येणारे भाडे तत्वावरील उत्पन्न हे स्वतःच्या खिशात खडसे घालत असून हा खरा भ्रष्टाचार आहे असा आरोप त्यांनी याप्रसंगी केला. प्रत्यक्ष सामान्य कुटुंबातील व्यक्ती आमदार झाला म्हणून त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

  दरम्यान काल खडसे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमागे महापुरुषांच्या पूजन प्रसंगी सॅंडल घालून ते गेल्याने त्यावर वाद होऊ नये म्हणून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर व माझ्या भाच्यावर आरोप केलेला आहे.

  आदिशक्ती मुक्ताईच्या दान पेट्यांचा पैसा कुठे जातो? संत निवासाच्या उपयोग कुणासाठी केला जातो? तुमचा भाचा कोणत्या प्रकरणात अडकलेला आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माझ्या आमंत्रणावरून दुसऱ्यांदा येत आहेत हे त्यांना पचनी पडत नसून त्या असून आसुये पोटी ते आरोप करत आहेत. तसेच गेल्या तीन वर्षांपासून अनेक धरणांची कामे अपूर्ण व संथ गतीने निधी मिळाला नसल्याचे खडसे म्हणतात मग तीन वर्ष जलसंपदा मंत्री आणि अर्थ मंत्री हे तुमचे होते, त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही, की निधी आणण्यासाठी तुम्ही कमी पडले ? असा परखड सवाल देखील त्यांनी याप्रसंगी केला.