शंकराचार्यांचा अपमान करणारेे हिंदूंचे रक्षणकर्ते कसे? ; आमदार भास्कर जाधवांचा खडा सवाल 

राममंदिरातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी शंकराचार्यांना डावलून केवळ सगळं माझ्याचजवळ पाहिजे, या वृत्तीच्या दिल्लीश्वरांनी त्यांचा अपमान केला आहे. शंकराचार्यांचे या मंदिराच्या कामात याेगदान काय? असा प्रश्न उपसि्थत करून त्यांना हिणवले. अशा भाजपाकडून काय हिंदूंचा उद्धार हाेईल का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. केवळ हिंदूंचे रक्षणकर्ते आहाेत, असे म्हणून हिंदूंचे रक्षण हाेणार नाही तर हिंदूंच्या देव-देवता आणि साधू-महंतांचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले. येथील अनंत कान्हेर मैदानावर आयाेजित सभेत मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते.

    नाशिक :  राममंदिरातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी शंकराचार्यांना डावलून केवळ सगळं माझ्याचजवळ पाहिजे, या वृत्तीच्या दिल्लीश्वरांनी त्यांचा अपमान केला आहे. शंकराचार्यांचे या मंदिराच्या कामात याेगदान काय? असा प्रश्न उपसि्थत करून त्यांना हिणवले. अशा भाजपाकडून काय हिंदूंचा उद्धार हाेईल का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. केवळ हिंदूंचे रक्षणकर्ते आहाेत, असे म्हणून हिंदूंचे रक्षण हाेणार नाही तर हिंदूंच्या देव-देवता आणि साधू-महंतांचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले. येथील अनंत कान्हेर मैदानावर आयाेजित सभेत मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते. (How can those who insult Shankaracharya be the protectors of Hindus? : A tough question from MLA Bhaskar Jadhav )

    ज्या अजित पवारांनी निधी दिला नाही म्हणून आम्ही शिवसेनेपासून दूर गेलाे, असे म्हणणारे आज त्याच अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्या नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून बाहेर काढले नाही, त्यामुळे आमचा अपमान हाेत हाेता, असे म्हणायचे अन‌ आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे हे किती बरबटलेले आहेत अन‌ किती भ्रष्टाचारी आहेत, हे आता सर्वसामान्य जनतेला समजले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल, यात शंका नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंना धाेका देऊन ४० जण बाहेर गेले, त्यावेळी आदित्य ठाकरेंनी पार पाडलेली जबाबदारी काैतुकास्पद असून, येत्या काळात त्यांनाही माेठे यश मिळेल, यात शंका नाही.

    उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले, त्यांच्यावर माेठी शस्त्रकि्रया झाली, आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या थरावर आराेप झाले तरीदेखील रश्मी ठाकरे डगमगल्या नाहीत. एवढे खंबीर पाठबळ देण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे. ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी बाेलताना म्हणाले.